हे आहे जी.एस.बी गणेश मंडळाच्या प्रसादाचं वैशिष्ट्य !

जी.एस. बी गणेशोत्सव मंडळाची ओळख मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपती अशी आहे. याचे कारणही तितकेच खास आहे. कारण या गणपतीच्या आभुषणासाठी आणि सजावटीसाठी ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर केला आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 22, 2017, 07:02 PM IST
हे आहे जी.एस.बी गणेश मंडळाच्या प्रसादाचं वैशिष्ट्य ! title=

मुंबई : जी.एस. बी गणेशोत्सव मंडळाची ओळख मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपती अशी आहे. याचे कारणही तितकेच खास आहे.

कारण या गणपतीच्या आभुषणासाठी आणि सजावटीसाठी ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर केला आहे. 

गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजेच जी.एस. बी समाजाकडून  स्थापन  केलेल्या गणेशमूर्तीप्रमाणेच या गणेशोत्सव मंडळाची पूजा, सजावट जितकी खास असते,  तितकाच खास या गणेश मंडाळाचा प्रसादही असतो. 

काय वैशिष्ट्य आहे जी.एस. बी मंडळाच्या प्रसादाचे ? 

जी.एस. बी मंडळाच्या प्रसादामध्ये पंचखाद्यांचा समावेश असला तरीही नारळाचा वापर प्रामुख्याने केला जातो. यंदा मंडळाने सुमारे २ लाख नारळांची ऑर्डर दिली आहे. 

येणार्‍या प्रत्येक भाविकाला किमान खोबर्‍याचा तुकडा/ वाटी प्रसाद  म्हणून दिला जातो. सोबतच पंचखाद्यांचा प्रसाद बनवला जातो. यामध्ये पोहे, खोबरं, गूळ. लाह्या, वेलची पावडर, तीळ यांचा वापर केला जातो. मंडळाकडून अशाप्रकारे हेल्दी स्वरूपाचा आणि पारंपारिक पद्धतीचा विसर्जनापर्यंत भाविकांना दिला जातो.   यासोबातच जाणून घ्या वडाळ्याच्या जी. एस. बी गणपतीची ही  खास वैशिष्ट्यं !