गुजरातचा दलित नेता जिग्नेश मेवाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देत त्यांच्यासाठी पर्याय ठरू पाहणारा नेता अशी जिग्नेश मेवाणीची ओळख. गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले  जिग्नेश मेवाणी नव्या वर्षात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणार आहेत. 

Updated: Dec 26, 2017, 10:59 AM IST
गुजरातचा दलित नेता जिग्नेश मेवाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर title=

मुंबई : प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देत त्यांच्यासाठी पर्याय ठरू पाहणारा नेता अशी जिग्नेश मेवाणीची ओळख. गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले  जिग्नेश मेवाणी नव्या वर्षात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणार आहेत. 

 राजकीय वर्तुळात सध्या वेगळीच चर्चा

आमदार जिग्नेश मेवाणी यांचा हा दौरा राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देणारा ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगलीय. देशांतल्या सर्वाधिक राजकीय ताकदीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात येथे आव्हान देणारा तरूण आमदार झालेला जिग्नेश मेवानी. 

राज्यात नवं दलित तरूण नेतृत्व तयार होणार का?

जिग्नेश तरूण दलित चेहरा झाला. आता हा तरूणच महाराष्ट्र राज्यात नव वर्षाच्या सुरूवातीला येत आहे. जिग्नेश यांच्या या एन्ट्रीला राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली. राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांवर जिग्नेश वरचढ ठरणार का ? भविष्यात राज्यात नवं दलित तरूण नेतृत्व तयार करणार का, असे अनेक विषयाची चर्चा आता सुरू झाली. मात्र प्रस्थापित दलित नेते मात्र त्यास फारस महत्त्व देत नसल्याचे सांगतात. 

जिग्नेश आला तर स्वागत आहे, पण तेढ निर्माण होऊ नये ही खबरदारी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

या  प्रस्थापितांना मोठे आव्हान

 रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंद आंबेडकर, जोगेंद्र कवाडे असे अनेक नेते सध्या दलित मताच नेतृत्त्व करतात. मात्र बहुतेक हे सर्व नेते पन्नाशी आसपास आहेत. दलित तरूणांना भावेल असा तरूण चेहरा जिग्नेश भविष्यात चेहरा झाला तर राजकारण वेगळ्या दिशेने जााते का याकडे लक्ष लागले आहे.