मोहंमद शमीची पत्नी होती, चीअर लीडर आणि....

 टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहमद शमीची बायको हसीनने शमीवर कथित आरोप.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 8, 2018, 06:12 PM IST
मोहंमद शमीची पत्नी होती, चीअर लीडर आणि....

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहमद शमीची बायको हसीनने शमीवर कथित आरोप लावले आहेत की, पाकिस्तानातील एक महिलेसोबत त्याचे एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर आहे. तसेच त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलेन्सचाही आरोप लावण्यात आला आहे. हसीनचं मोहंमद शमीसोबत दुसरं लग्न आहे.

एक पोस्ट फेसबुकवर देखील शेअर

हसीनने या संबंधित एक पोस्ट फेसबुकवर देखील शेअर केली आहे. ज्यात व्हॉटसअॅप स्क्रीन शॉटस शेअर करण्यात आले आहेत. यातील स्क्रीन शॉटस हे शमीने इतर मुलींशी केलेल्या चॅटशी संबंधित आहेत.

अनेक मुलींशी मोहमद शमी करायचा चॅट

शमीवर बायकोने आरोप केले आहेत की, तो इतर मुलीशी चॅट करतो, अंतरंग होण्यासंबंधीचे, हसीनने हे देखील आरोप केले आहेत की दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर शमीने आपल्याला मारहाण केली आहे. मोहंमद शमीने त्याच्यावर केलेल्या आरोपांचं ट्वीटरवर उत्तर दिलं आहे.

हसीन आणि मोहंमद शमीची लव्हस्टोरी

हसीन आणि मोहंमद शमीने लव्ह मॅरेज केलं आहे, त्यांची पहिली ओळख ही २०१२ मध्ये आयपीएलच्या सामन्या दरम्यान झाली. असं म्हणतात की शमीला पहिल्याचं नजरेत हसीन आवडली होती.

अनेक दिवस एकमेकांनी डेटिंग

अनेक दिवस एकमेकांनी डेटिंग केली, यानंतर शमी आणि हसीनचं लग्न मुरादाबाद दिल्ली रोडवरील फाईव्ह स्टार हॉ़टेलमध्ये पार पडलं. या विवाहात निवडक लोकांना बोलावण्यात आलं होतं.

हसीनचं डिग्रीपर्यंतच शिक्षण

हसीनच्या बाबतीत असं सांगण्यात येतंय की, तिने डिग्रीपर्यंतच शिक्षण केलं आहे, तिचे पिता मोहम्मद हसन कोलकाताचे प्रसिद्ध ट्रान्सपोर्टर आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, हसीन लहानपणापासून मॉडलिंग करू इच्छीत होती. हसीनने अनेक दिवस मॉडेलिंग केली. ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर देखील होती.

चीअर लीडर असताना झाली ओळख

जेव्हा हसीन चीअर लीडर होती, तेव्हा तिची ओळख शमी सोबत झाली, पण लग्नानंतर शमीने आपलं करिअर सोडून ती घरात रमली. हसीनला अनेक वेळा फॉरेन टूरवर पाहण्यात आलं आहे. दोघांना एक चार वर्षाची मुलगी देखील आहे.