मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी पित्याने सिंगापूर गाठलं

भारतातल्या एका उद्योगपतीने आपल्या लाडक्या मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी सिंगापूर गाठलं.

Updated: Sep 25, 2017, 12:07 AM IST
मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी पित्याने सिंगापूर गाठलं title=

मुंबई : भारतातल्या एका उद्योगपतीने आपल्या लाडक्या मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी सिंगापूर गाठलं, एवढंच नाही हा उद्योगपती सिंगापुरात आयफोन 8 घेण्यासाठी १३ तास रांगेत उभा देखील राहिला. 

या उद्योगपतीचं नाव आहे, अमीन अहमद ढोलिया, ढोलिया हे ४३ वर्षांचे आहेत. मी माझ्या मुलींसाठी २ आयफोन खरेदी करणार आहे, जीवनात पहिल्यांदाच मी माझ्या मुलींसाठी रांगेत १३ तास उभा राहिलो असे ढोलिया यांनी म्हटले आहे. 

अॅपलने नुकताच १२ सप्टेंबर रोजी आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस लाँच केला. सकाळी जेव्हा कंपनीने आपले दुकान उघडले तेव्हा त्यांच्या रांगेत २०० हून अधिक जण होते. यातील बहुतांश लोक परदेशी असल्याचे ढोलिया यांनी सांगितले.