मुंबापुरीत सकाळपासून उन पावसाचा खेळ

मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.

Updated: May 29, 2017, 01:31 PM IST
मुंबापुरीत सकाळपासून उन पावसाचा खेळ title=

मुंबई :  मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे, सकाळपासून ऊन आणि सावली याचा खेळ सुरु आहे. त्यातच काही वेळ पडलेल्या पावसाने रस्ता ओला केला. घाटकोपर, साकीनाका भागात सकाळी थोडासा पाऊस झाला. त्यामुळे ऑफिसला निघालेल्या लोकांची तारांबळ उडाली होती.   

दरम्यान मे महिन्यात घामाने भिजलेले मुंबईकर पावसाची वाट पाहत आहेत. पावसामुळे सुरूवातीचा काही काळ का असेना, पण मुंबईकरांना उकाळ्यापासून सुटका मिळणार आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सून लवकरच दाखल होत असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.