मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस

 मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. 

Updated: Sep 14, 2017, 08:37 PM IST
मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस

मुंबई : मुंबई शहरात दिवसा वातावरणात उष्णता जाणवत असताना, आज संध्याकाळपासून मात्र धो-धो पाऊस होत आहे. मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. 

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागात पाऊस होत आहे. काही दिवसापूर्वी मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानंतर सर्वत्र पाणी साचलं होतं, यामुळे मुंबईकर आजच्या पावसाकडेही नजर लावून आहेत. 

मात्र आजचा पाऊस थोडासा का होईना, ब्रेक घेत असल्याने पाऊस साचणार नाही असं सांगितलं जात आहे. मुंबईत संध्याकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई या शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.