काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामे, मुंबई पालिकेचा अजब कारभार

काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामं देण्याचा मुंबई महापालिकेने सपाटा लावला आहे. नालेसफाईतील घोटाळेबाजांना ४२५ कोटींचं कंत्राट दिलेय. याबाबत विरोधी पक्षनेत्याने आयुक्तांना पत्र लिहिलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 24, 2017, 12:04 AM IST
काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामे, मुंबई पालिकेचा अजब कारभार title=

मुंबई : काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामं देण्याचा मुंबई महापालिकेने सपाटा लावला आहे. नालेसफाईतील घोटाळेबाजांना ४२५ कोटींचं कंत्राट दिलेय. याबाबत विरोधी पक्षनेत्याने आयुक्तांना पत्र लिहिलेय. 

घोटाळेबाज कंत्राटदारांवर मेहरबान

काळ्या यादीतल्या घोटाळेबाज कंत्राटदारांवर मुंबई महापालिका चांगलीच मेहरबान असल्याचं दिसतंय. कारण बीएमसीच्या अधिका-यांनी काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना पुन्हा नवी कंत्राटं देण्याचा घाट  घातलाय. 

नालेसफाईत भ्रष्टाचार 

नालेसफाईत भ्रष्टाचार केलेल्या जैन कुटुंबियांना तब्बल ४२५  कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. महापालिकेच्या घटनकचरा विभागानं हा कारनामा केलाय. मात्र घोटाळेबाज जैन कुटुंबियांच्या कंपन्यांना पुन्हा कंत्राट देण्यास काँग्रेसनं विरोध केलाय. 

आयुक्तांना पत्र लिहून विरोध

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना पत्र लिहून काम देण्यास विरोध केलाय. मात्र बीएमसीनं जैन कुटुंबियांच्या कंपन्यांवर चांगलीच मर्जी दाखवलीय.