पुणे-मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी

मंकी हिलजवळ महत्वाचं काम सुरू असल्याने ही वाहतूक २ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कर्जत ते पुणे वाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे. 

Updated: Sep 14, 2017, 06:53 PM IST
पुणे-मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी

मुंबई : मुंबई ते पुणे आणि पुण्याहून मुंबईला प्रवास करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर जर ही माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण १४ ते १५ सप्टेंबर दरम्याम मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई दरम्यानच्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मंकी हिलजवळ महत्वाचं काम सुरू असल्याने ही वाहतूक २ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कर्जत ते पुणे वाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे. 

कर्जत-पुणे, कर्जत पुणे शटल एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. डेक्कन सारख्या एक्स्प्रेस देखील अप-डाऊन मार्गाने दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

11009 मुंबई पुणे सिंहगड एक्स्प्रेस

11010 पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेस

11007 मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस

11008 पुणे मुंबई डेक्कन एक्स्पेस

51317 कर्जत पुणे शटल

51318 पुणे कर्जत शटल

------------------------------------------------

11025/11026 पुणे भुसावळ पुणे एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुणे भुसावळ पुणे एक्स्प्रेस दौंड मनमाड मार्ग प्रवास तुर्तास बदलणार आहे.