एक हाय ड्रामा, गेट वे ऑफ इंडिया जेट्टीवर... 'किंग' कौन..?

असा एक ड्रामा. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्या जेट्टीवर हा ड्रामा रंगला. दिवाळीनंतर काही दिवसांनी. या ड्राम्यानंतर तो चक्क बाहेर आला आणि शांत झाले. मात्र, तोपर्यंत हा सिन कॅमेऱ्यात कैद झाला.

Updated: Nov 10, 2017, 11:54 PM IST
एक हाय ड्रामा, गेट वे ऑफ इंडिया जेट्टीवर... 'किंग' कौन..?

मुंबई : असा एक ड्रामा. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्या जेट्टीवर हा ड्रामा रंगला. दिवाळीनंतर काही दिवसांनी. या ड्राम्यानंतर तो चक्क बाहेर आला आणि शांत झाले. मात्र, तोपर्यंत हा सिन कॅमेऱ्यात कैद झाला. ( बातमीच्या खाली व्हिडिओ पाहा)

या हाय ड्राम्यात प्रसंगात अँग्री यंग मॅन होते ते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील. त्यांना हॉवरक्राफ्टने आपल्या घरी अलिबागला जायचं होते. पण जेट्टीवर खोळंबा झाल्यानं ते चांगलेच भडकले होते.

रागाच्या भरात त्यांनी खूप काही सुनावले. आपल्या परवानगीशिवाय कुणी अलिबागमध्ये येऊ देखील शकत नाही,असंही ते चिडून म्हणाले. 

जयंत पाटील को गुस्सा क्यों आता है? त्याचे असे झाले अभिनेता किंग खान हा जेटीवर होता. शाहरुखमुळे येथे जवळपास एक तास जेट्टीवर खोळंबा झाला होता. याचा त्रास उपस्थितांना झाला. त्यानंतर हा ड्रामा पाहायला मिळाला..

पाहूयात ही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ क्लीप...