देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल - जयंत पाटील

 राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेना सरकारवर, निशाणा साधण्यासाठी या गाण्याचा वापर केला आहे. जयंत पाटील सोनू सारखं गाणं आज विधानसभेत वाचून दाखवलं.

Updated: Jul 31, 2017, 07:33 PM IST
देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल - जयंत पाटील title=

मुंबई : सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय का, या गाण्याने आता विधिमंडळातही छाप पाडली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेना सरकारवर, निशाणा साधण्यासाठी या गाण्याचा वापर केला आहे. जयंत पाटील सोनू सारखं गाणं आज विधानसभेत वाचून दाखवलं.

जयंत पाटील यांनी म्हटलेल्या गाण्याच्या काही ओळी अशा आहेत, ‘लाचार सत्तेसाठी झोल झोल, जनतेचा वाजतोय ढोल ढोल, देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल’ असे सांगत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. जयंत पाटील यांचे सोनू व्हर्जन ऐकून सभागृहातील आमदारांनी बाक वाजवत, हसत प्रतिसाद दिला.