राज्यातल्या खराब रस्त्यांविषयी बांधकाम मंत्र्यांची धक्कादायक कबुली

खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी कबुली दिलीयं.

Updated: Oct 22, 2018, 04:41 PM IST
राज्यातल्या खराब रस्त्यांविषयी बांधकाम मंत्र्यांची धक्कादायक कबुली  title=

कल्याण : राज्यातल्या बहुसंख्य रस्त्यांना खड्ड्यांचा विखळा आहे. खड्डयांमुळे अनेकांचे बळीही गेलेत. मात्र तरीही संबंधित रस्त्यांची दुरूस्ती झाली नाही. मात्र मंत्रीसाहेब गावात येणार हे कळताच सर्व यंत्रणा कामाला लागते आणि केवळ दुरूस्तीच नव्हे तर एका आठवड्यात काँक्रिटचे रस्ते उभारले जातात. असं दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनीच ही कबुली दिलीय.

भाषणात वास्तव 

त्यामुळे मंत्री असण्याचे फायदे त्यांनी यावेळी बालून दाखवले. कल्याणजवळच्या मुठवळ नावाच्या गावात गृहनिर्माण प्रकल्पाच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी हे वास्तव सांगितलं. 

त्यामुळे मंत्री ज्या गावात येतील, तिथलेच रस्ते सरकारी यंत्रणा तयार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 तसं असेल तर मग रस्त्यांची दूरवस्था असलेल्या गावांचा दौरा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील कधी करणार ? असाही प्रश्न निर्माण झालायं.