अनंत अंबानीसोबत दिसणारी राधिका मर्चेंट नेमकी आहे तरी कोण?

 रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानींच्या घरी लगीनघाई आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

Updated: May 17, 2018, 08:59 AM IST
अनंत अंबानीसोबत दिसणारी राधिका मर्चेंट नेमकी आहे तरी कोण?

मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानींच्या घरी लगीनघाई आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अलिकडेच त्यांचा मोठा मुलगा आणि मुलगी म्हणजेच आकाश आणि ईशा यांचा साखरपुडा झाला. त्यातच आता त्यांच्या लहान मुलाने म्हणजे अनंत अंबानीच्या साखरपुड्याची चर्चा जोर धरत आहे. मात्र अंबानी कुटुंबियांकडून याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. अनंत अंबानीने उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंट सोबत साखरपुडा केल्याची चर्चा होती. पण ही राधिका मर्चेंट नेमकी आहे तरी कोण?

कोण आहे राधिका मर्चेंट?

मुकेश अंबानींच्या मुलीच्या ईशाच्या साखरपुड्यात पद्मावतच्या घुमर गाण्यात ईशासोबत दोन मुली स्टेजवर नाचत होत्या. त्यात एक होती आकाश अंबानीची होणारी पत्नी आणि अंबानींची मोठी सून श्लोका मेहता तर दुसरी होती अनंत अंबानीची मैत्रिण राधिका मर्चेंट. तर जाणून घेऊया अनंतच्या या खास मैत्रिणीबद्दल...

  • राधिका उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चेंट हे इनकॉर हेल्थकेअरचे डिरेक्टर आणि चेअरमन आहेत. तिचे नाव मुकेश अंबानींच्या लहान मुलाशी अनंत अंबानीशी जोडले गेले असून त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • या फोटोवरुन त्या दोघांच्या सारखपुड्याची चर्चा रंगली. मात्र दोन्ही कुटुंबियांकडून याबद्दल कोणतीहा दुजोरा देण्यात आला नाही. त्यानंतर अंबानी परिवाराने सारखपुड्याची खबर ही अफवा असल्याचे सांगितले.
  • राधिकाने आपले शालेय शिक्षण कॅथड्रियल अॅंड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोन्डियल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने न्युयॉर्क युनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
  • २४ वर्षांच्या राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात केडार कन्संलटेंट, देसाई अॅंड दिवानजी आणि इंडिया फर्स्ट यांसारख्या कंपनीतून केली. राधिका अॅनिमल वेलफेयर संबंधित काम करते.

मुकेश अंबानी, Mukesh Ambani, Radhika Merchant, Anant Ambani, Isha Ambani, Who is Radhika Merchant