महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर रस्ते, रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

 महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मुंबईच्या तीनही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत झालेय. तसेच रस्ता वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 3, 2018, 06:34 PM IST
महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर रस्ते, रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
करीरोड येथील हे दृश्य टीपलंय प्रशांत जाधव यांनी

मुंबई : राज्यात महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद उमटलेत. अनेक ठिकाणी रस्तारोको, रेलेरोको करण्यात आला. तर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्यात. गाड्या तसेच एसटीची तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मुंबईच्या तीनही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत झालेतय. १० तासांच्या बंदनंतर रस्ते वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर मेट्रोची वाहतूकही सुरळीत झालेय. तसेच रस्ता वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

दहा तासांनी बंद मागे

तब्बल दहा तासांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलाय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केलीय. आता मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरच्या लोकल्स सुरळीत सुरू झाल्यात. त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेसवेवरची अडवून धरलेली वाहतूकही खुली झाली आहे.

वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

इस्टर्न हायवेवरची वाहतूकही हळूहळू सुरळीत होतेय. काही काळासाठी विस्कळीत झालेली मेट्रो वाहतूकही सुरळीत झालीय. भीमा कोरेगाव प्रकरणी आंबेडकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला मुंबईसह राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला.

'भिडे, एकबोटेंना अटक करा'

आबंडेकरी संघटनांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलाय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी बंदला पाठिंबा दिल्याबंदल त्यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानलेत. काही अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी महाराष्ट्र बंद शांततेत पार पडल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर कलम ३०२चे खटले दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणीही आंबेडकरांनी केलीय.

महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर रस्ते, रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close