सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या खिडक्यांना ग्रील लावणार

मंत्रालयात शेतक-याने आत्महत्येची धमकी देत झालेले थरार नाट्य लक्षात घेता मंत्रालयांतील खिडकीबाहेर आता ग्रील लावले जाणार आहे. 

Updated: Nov 14, 2017, 05:19 PM IST
सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या खिडक्यांना ग्रील लावणार

मुंबई : मंत्रालयात शेतक-याने आत्महत्येची धमकी देत झालेले थरार नाट्य लक्षात घेता मंत्रालयांतील खिडकीबाहेर आता ग्रील लावले जाणार आहे. संबंधित शेतकरी खिडकीबाहेर सज्ज्यावर गेला होता आणि आत्महत्या करु अशी धमकी दिली होती.

नजर चुकवून एखादी व्यक्ती खिडकीबाहेर कशी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. तेव्हा याबाबत ग्रील लावून खिडकी सुरक्षित करता येईल अशी सुचना करण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. याबाबत लवकरच अमंलबजावणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.