मराठा क्रांती मोर्चाने सरकारचे ७ जीआर फाडले

मराठा क्राती मोर्चाची राज्यव्यापी बैठक मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली.

Updated: Apr 28, 2018, 06:31 PM IST

मुंबई : मराठा क्राती मोर्चाची राज्यव्यापी बैठक मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेले सात जीआर फाडून फेकण्यात आले. सरकार मराठा समाजाची आरक्षणासंदर्भात दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.