मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम मार्गावर नाईट ब्लॉक असणार आहे. 

Updated: Jul 30, 2017, 09:00 AM IST
मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम मार्गावर नाईट ब्लॉक असणार आहे. 

मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी-माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 

पश्चिम रेल्वे मार्गावर ३१ जुलैच्या रात्री वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे नाईट ब्लॉक असेल. 

दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यत दुरूस्तीची कामे करण्यात येतील. तर सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी १०.३८ ते दुपारी ४.१३ वाजेपर्यत बंद राहील.