मुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Updated: Aug 27, 2017, 10:07 AM IST
मुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील वाहतूक अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल गाड्या अंदाजे वीस मिनिटं उशिरा धावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर हार्बर रेल्वेवरील कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजून वीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठेचाळीस मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल अशा विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.