मुंबई आणि उपनगरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस

२९ ऑगस्टला मुसळधार कोसळून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईत मध्यरात्री मात्र प्रचंड कोसळला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने मुंबईला मध्यरात्री झोडपून काढले.

Updated: Sep 13, 2017, 09:35 AM IST
मुंबई आणि उपनगरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस

मुंबई : २९ ऑगस्टला मुसळधार कोसळून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईत मध्यरात्री मात्र प्रचंड कोसळला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने मुंबईला मध्यरात्री झोडपून काढले.

रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस दीड-दोन तास कोसळत होता. विजांचा लखलखाट आणि प्रचंड आवाजामुळे मुंबईकरांची झोपमोड झाली. मुंबईसह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

गेल्या चार दिवसांपासून गरमीनं हैराण मुंबईकरांना थोडा दिलासा मिळेल असा रात्रीपासून वातावरणात थोडा थंडावा निर्माण झाला आहे.