मीरा-भाईंदर निवडणुकीत मनसेचे इंजिन यार्डातच

९५ पैकी ५४ जागा जिंकत मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहूमत मिळवले आहे. मात्र, मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मनसेचे इंजीन पुन्हा एकदा यार्डातच राहिले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 21, 2017, 04:25 PM IST
मीरा-भाईंदर निवडणुकीत मनसेचे इंजिन यार्डातच title=

मुंबई / भाईंदर : ९५ पैकी ५४ जागा जिंकत मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहूमत मिळवले आहे.  मनसेला मात्र या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मनसेचे इंजीन पुन्हा एकदा यार्डातच राहिले आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने गल्ली ते दिल्ली सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले. दरम्यान, भाजप पाठोपाठ १७ जागा जिंकत शिवसेना दूसऱ्या, ११ जागा जिंकत कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहीली आहे. अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत.

भाजपसाठी हा विजय मोठा असला तरी, मागच्या वेळच्या तुलनेत शिवसेनेच्याही जागा मर्यादित प्रमाणात वाढल्या आहेत. तर, या ठिकाणी कॉंग्रेसला ८ जागांचा फटका बसला आहे.  मनसेच्या इंजिनाचे आणि बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीचे मात्र या निवडणूकीत १२ वाजले. इंजिन यार्ड़ाबाहेर आलेच नाही. तर आघाडीची शिट्टी भोपळा फोडण्यापूरतीही वाजली नाही.