मुंबईतील एका बँकेच्या शाखांवर सीबीआयच्या धाडी

नोटाबंदी काळात या बॅंकेने नोट बदलून दिल्याचा संशय आहे नोटाबंदी दरम्यान या बॅंकेचा कॅश फ्लो कित्येक पटीने वाढला होता. 

Updated: Jul 8, 2017, 10:47 PM IST
 मुंबईतील एका बँकेच्या शाखांवर सीबीआयच्या धाडी title=

मुंबई : नोटाबंदीच्या काळात बॅंकेची भूमिका संशयास्पद असल्याने काही पुराव्यांच्या आधारे, मुंबईत सीबीआयने एका मोठ्या बॅंकेच्या अनेक शाखांवर धाडी टाकल्या. 

नोटाबंदी काळात या बॅंकेने नोट बदलून दिल्याचा संशय आहे नोटाबंदी दरम्यान या बॅंकेचा कॅश फ्लो कित्येक पटीने वाढला होता. 

सरकारने सुरुवातीला जुन्या नोटांच्या बदल्यात काही हजारच नवीन नोटा बदलून देण्याचे आदेश बॅंकाना दिले होते.  त्या वेळी या बॅंकेनं नियमबाह्य काम केल्याचा संशय आहे.