आरामदायी बम्बार्डियर लोकलचं प्रवाशांकडून स्वागत

पश्चिम रेल्वेवर हवेशीर आणि आरामदायी बम्बार्डियर लोकल गाडय़ांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने सोमवारपासून बम्बार्डियर लोकल सीएसएमटी ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यास सुरवात केली आहे.

Updated: Dec 20, 2017, 04:24 PM IST
आरामदायी बम्बार्डियर लोकलचं प्रवाशांकडून स्वागत title=

मुंबई : पश्चिम रेल्वेवर हवेशीर आणि आरामदायी बम्बार्डियर लोकल गाडय़ांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने सोमवारपासून बम्बार्डियर लोकल सीएसएमटी ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यास सुरवात केली आहे.

या अंतर्गत पहिली लोकल सोमवार पासून सुरू झाली असून तिच्या बारा फेऱ्या होत आहेत. या नव्या लोकल सेवेचं प्रवाशांनी स्वागत केलंय.