गटारात भाजी लपवल्याप्रकरणी मुंबई पालिका करणार कारवाई

सांताक्रुझ इथल्या वाकोला परिसरात गटारात भाजी लपवल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. याबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारीत केले होते. झी मीडियाच्या या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आलीय. 

Updated: Feb 10, 2018, 03:47 PM IST
गटारात भाजी लपवल्याप्रकरणी मुंबई पालिका करणार कारवाई title=

मुंबई : सांताक्रुझ इथल्या वाकोला परिसरात गटारात भाजी लपवल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. याबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारीत केले होते. झी मीडियाच्या या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आलीय. 

गटारात भाजी लपवल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती मिळतेय. गटारात भाजी लपवून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतेय. त्यामुळे त्या फेरीवाल्यांवर कारवाई होणार का याकडंही आता लक्ष लागलंय. 

वाकोल्यात गटारात भाजी लपवून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणा-या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मुंबईकरांकडून होतेय. मुंबई पालिका आणि पोलिसांनी यांत अधिक लक्ष द्यावे असंही मुंबईकरांनी म्हटलंय.