कमला मिल दुर्घटना : आगीप्रकरणी हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलं

कमला मिल आगीप्रकरणी हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलंय.

Updated: Jan 15, 2018, 03:05 PM IST
कमला मिल दुर्घटना : आगीप्रकरणी हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलं title=

मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलंय.

काय म्हणालं हायकोर्ट?

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरू करताना सगळे परवाने योग्य पद्धतीने दिले जातात का? हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या ठिकाणी अग्निरोधक नियमावलीचं योग्य रितीने पालन होतंय की नाही, यावर स्थानिक प्रशासन या नात्यानं पालिकेची देखरेख हवी, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू होती.

डोळे उघडणारी घटना

कमला मिलची आग ही प्रशासनाचे डोळे उघडणारी ठरलीय. मुंबईसारख्या ठिकाणी फुटपाथवरही खाद्यपदार्थ शिजवून लोकांना दिले जातात, जर कमला मिल सारखी दुर्घटना सार्वजनिक ठिकाणी घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल हायकोर्टानं केलाय. याप्रकरणी महापालिका गुरुवारी अहवाल सादर करणार आहे.