मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग

मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: May 27, 2018, 06:13 PM IST

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.