मुंबई मेट्रो ३ च्या काम : ध्वनी प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

दक्षिण मुंबईतल्या मेट्रो ३ च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2018, 01:49 PM IST
मुंबई मेट्रो ३ च्या काम : ध्वनी प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल title=

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या मेट्रो ३ च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मेट्रो 3च्या कामात होणाऱ्या आवाजामुळे प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत का? याची तपासणी करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागलांच्या खंडपिठासमोर आवाज नावाच्या सामाजिक संस्थेनं केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. 

या सुनावणीत चर्चगेट, कफ परेड आणि माहिममध्ये सुरु असलेल्या कामादरम्यान डेसिबल मर्यादा ओलांडली जात असून त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. आवाज संस्थेनं केलेल्या तपासणी चर्चेगटमध्ये आवाजाचा स्तर ११० डेसिबलपर्यंत जात असल्याचं डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आढळून आलं. या तपासणीच्या आधारेच ही याचिका करण्यात आली आहे. याप्रकरणी २५ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.