मुंबई म्हाडातर्फे ८१९ सदनिकांची जाहिरात

अर्जदारांना १६ सप्टेंबरपासून  ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 

Updated: Sep 14, 2017, 06:32 PM IST
  मुंबई म्हाडातर्फे ८१९ सदनिकांची जाहिरात

मुंबई :  म्हाडातर्फे मुंबईतील ८१९ सदनिकांची १० नोव्हेंबरला सोडत निघणार आहे, याविषयी उद्या सविस्तर जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित होणार आहे. अर्जदारांना १६ सप्टेंबरपासून  ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 

म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वांचं लक्ष लागून असतं, अल्प, उच्च, अत्यल्प उत्पन्न गट यांच्यासाठी ही जाहिरात आहे, पवई, गोरेगाव, सायन, लोअर परळ या ठिकाणी ही घर आहेत.

दरवर्षी म्हाडाची जाहिरात प्रकाशित होते, मात्र यावेळी ही जाहिरात उशीराने प्रकाशित झाली आहे, दरवर्षी ही जाहिरात जून जुलै महिन्यात प्रकाशित होत होती.

म्हाडाच्या घरांच्या किंमती वाढल्या असल्याच्या तक्रारी दरवर्षी असतात, मात्र .यावेळेस म्हाडाने घराच्या किंमती कशा ठेवल्या आहेत, हे अजून समजू शकलेले नाही.