मुंबईत रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, रविवारी (१७ डिसेंबर रोजी) रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Updated: Dec 16, 2017, 11:27 PM IST
मुंबईत रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक  title=

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, रविवारी (१७ डिसेंबर रोजी) रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे:

मध्य रेल्वेवर रविवार, १७ डिसेंबर रोजी कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या ब्लॉक दरम्यान अप स्लो मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला, दादर स्थानकावर थांबतील.

सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार असून या लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील.

तसेच रविवारी रत्नागिरी-दादर पँसेजर अंतिम थांबा दादर ऐवजी दिवा स्थानका असणार. परतीच्या मार्गावर दादर-रत्नागिरी पँसेंजरदेखील दिवा स्थानकावरून सुटेल.ब्लॉक कालावधीत मुंबईकडे ये-जा करणाऱ्या मेल-एक्सप्रेस सुमारे अर्धा तास उशीरा धावतील.

हार्बर रेल्वे: 

हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.ॉ

ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाउन लोकल गाड्यांची वाहतुक सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३० वाजेपर्यत नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलगाड्या देखील सकाळी ११.०२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यत पनवेल ते नेरुळ दरम्यान बंद राहणार आहे.

पनवेल-अंधेरी लोकलची वाहतुक देखील बंद असणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते नेरुळ आणि वाशी दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

ब्लाक दरम्यान विरार-वसई रोड ते बोरीवली-गोरेगाव दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतुक अप आणि डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.