आठवले- ढाले एकाच मंचावर, 40 वर्षातला दुरावा संपला

 गुरु-शिष्यामधला दुरावा रविवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांसमोर कायमचा संपला. 

Updated: Oct 1, 2018, 11:22 AM IST
आठवले- ढाले एकाच मंचावर, 40 वर्षातला दुरावा संपला  title=

मुंबई : आंबेडकरी चळवळीत सुमारे 40 वर्षांपूर्वी मतभेद आणि संघटनेतल्या फुटीमुळे निर्माण झालेला गुरु-शिष्यामधला दुरावा रविवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर कायमचा संपला. दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त प्रभादेवीतील रवींद्रनाट्य मंदिरात अभीष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

ढालेंचं सूचक विधान 

या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील नेते, विचारावंतांबरोबर सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी आठवलेंनी गुरुस्थानी असलेल्या ढालेंविषयी आपल्या कवितेतून आदर व्यक्त केला.

तर शिष्य आठवलेंशी कुठलंही वैर नसल्याचं स्पष्ट करताना ढालेंनी भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा दाखला दिला.

आठवलेंशी पुन्हा जुळलेल्या नात्याचा कुणी राजकीय अर्थ काढू नये असं सूचक विधान करायला ढाले विसरले नाहीत.