१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.

Updated: Jun 28, 2017, 02:25 PM IST
१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू title=

मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोटा प्रकरणात दोषी ठरलेला मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर तिथला पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली होती. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.

जे जे हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोसाला हाय ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचाही त्रास होता. डोसानं हृदयरोगासंदर्भात विशेष न्यायालयालाही सूचना देऊन बायपास सर्जरी करण्याची परवानगी मागितली होती. 

बॉम्बस्फोटाचा दुबईत कट रचणे, कटासाठी माणसांची जुळवा जुळव करुन त्यांना ट्रेनिंगकरता पाकिस्तानात पाठवणे, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, खुन, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे मुस्तफा डोसावर दाखल होते.