VIDEO : सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

...आणि काही कळायच्या आताच जीबीन सनी खाली कोसळला 

Updated: Dec 14, 2018, 04:00 PM IST
VIDEO : सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू  title=

मुंबई : रस्सीखेच खेळत असताना अचानकपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना विद्याविहारमधील सोमय्या महाविद्यालयात घडली. त्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांवर शोककळा पसरलीय. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणारा जीबीन सनी हा कॉलेजमधील खेळात सहभागी झाला होता. रस्सीखेच सुरू असताना जीबीननं सर्वांच्या पुढे उभे राहत आपली ताकद लावली आणि रस्सीखेचचा दोर ही आपल्या मानेवर घेतला. मात्र, काही कळायच्या आताच जीबीन खाली कोसळला. 

या घटनेनं गोंधळलेल्या कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित जीबीनला राजावाडी रुग्णालयात आणलं. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

सोमय्या विद्याविहारच्या नर्सिंगचा हा विद्यार्थी होता. जीबीन सनीचं वय २२ वर्ष त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? हे शवविच्छेदन झाल्यावर कळणार आहे.