मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : उरलेल्या २ जागांवरही युवासेना आघाडीवर

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या युवसेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय.

Updated: Mar 29, 2018, 08:17 AM IST
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : उरलेल्या २ जागांवरही युवासेना आघाडीवर title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या युवसेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. १० पैकी ८ जागांवर विजय मिळवत युवासेननं प्रमुख प्रतिस्पर्धी अभाविपचा सुपडा साफ केलाय. अजूनही उरलेल्या दोन जागांवर मतमोजणी अजूनही सुरू आहे. याआधीच्या अधिसभेत युवासेनेचे ८ आणि अभाविपचे दोन प्रतिनिधी होते. यंदा मात्र सर्व दहाच्या दहा जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

मतमोजणी सुरू 

मुंबई विद्यापीठ अधीसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. युवासेनेनं या निवडणुकीत १० पैकी ८ राखीव जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय. आता खुल्या गटातली २ जागांची मतमोजणी सुरू आहे.