मुंबईतल्या १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं

मुंबईतल्या चांदिवली येथील तुंगागाव विभागात राहणा-या १० वर्षाच्या रितेश बबलू सिंग याचं अपहरण आणि हत्येचं गूढ उकललं आहे.

Updated: Nov 14, 2017, 10:38 PM IST
मुंबईतल्या १० वर्षीय रितेशच्या हत्येचं गूढ उकललं

मुंबई : मुंबईतल्या चांदिवली येथील तुंगागाव विभागात राहणा-या १० वर्षाच्या रितेश बबलू सिंग याचं अपहरण आणि हत्येचं गूढ उकललं आहे. रितेशच्या काकांनीचं म्हणजे अमरसिंग ह्यानेच हत्या केल्याचं उघडकीस आलंय.

काही पैशांच्या अमिषापायी अमरसिंग आणि त्याचा मित्र लालूसिंग या दोघांनी त्याचा गळा आवळून निर्घुण हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचं पोलीस अधिका-यांचं म्हणणं आहे. ह्या नराधमांना मोठ्यात मोठी शिक्षेची मागणी रितेशच्या आईने आणि परिवाराने केलीय दरम्यान अमर सिंग आणि लालू सिंग या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे.