नारायण राणेंचा भाजपला इशारा, रोखठोक मुलाखतीत मांडली पुढील भूमिका

दीर्घकाळ वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही, असं सांगत भाजपने आपल्याला मंत्रीमंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर...

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 30, 2017, 03:29 PM IST
नारायण राणेंचा भाजपला इशारा, रोखठोक मुलाखतीत मांडली पुढील भूमिका

मुंबई : दीर्घकाळ वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही, असं सांगत भाजपने आपल्याला मंत्रीमंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही, तरी आपल्या पक्षाचे काम सुरू राहील, अशा शब्दांत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

आपल्याला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे बोलत होते. ३१ डिसेंबरपूर्वी मंत्रीमंडळात समावेश करण्याचे आश्वासन आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असं सांगताना आपण भाजपकडे मंत्रीपद मागितले नव्हते तर त्यांनीच आपल्याला ती ऑफर दिली होती.  

शिवसेना का घाबरते?

शिवसेना आपल्या प्रवेशाला का घाबरते, असा सवाल उपस्थित करताना त्यांनी पाठिंबा काढला तरी सरकार कोसळणार नाही, असा दावाही राणे यांनी या मुलाखतीत केला आहे. 

कर्जमाफी दिली तर भाजप तरेल?

शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या भावाबाबतचा प्रश्न सरकारने सहा महिन्यात निकाली काढला तरच सरकार तरेल, वाढत्या शेतकरी आत्महत्या सरकारसाठी चांगल्या नाहीत, असा इशारावजा सल्ला राणेंनी भाजपा सरकारला दिला आहे. राणेंची ही सविस्तर रोखठोक मुलाखत आपण आज झी २४ तासवर सायंकाळी ५.३० वाजता पाहू शकता.