राष्ट्रवादीच्या या नेत्यानं धरले नितीन गडकरींचे पाय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी नितीन गडकरींचे पाय धरले आहेत.

Updated: Feb 13, 2018, 08:53 PM IST
राष्ट्रवादीच्या या नेत्यानं धरले नितीन गडकरींचे पाय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी नितीन गडकरींचे पाय धरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण ढोबळे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. ढोबळे यांनी सहकारमंत्री सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतले.

गेल्या काही दिवसांपासून ढोबळे भाजपच्या संपर्कात आहेत पण त्यांना अजूनही भाजप प्रवेश मिळालेला नाही. पण आता नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतल्यामुळे पुन्हा एकदा ढोबळेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी लक्ष्मण ढोबळे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याचं बोललं जातंय. अशातच ढोबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतले.

न्यायालयामध्ये एक प्रकरण सुरु असल्यामुळे भाजप प्रवेश करण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्याचं ढोबळे यांनी याआधी सांगितलं होतं. याआधीही ढोबळेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. ढोबळे यांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढायची आहे. यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोन पर्याय ढोबळेंपुढे असल्याचं बोललं जातंय.