वाहतूक नियम मोडल्याने बाचाबाची, मारहाणीत एकाचा मृत्यू

वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल जाब विचारणाऱ्याला, हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.

Updated: Sep 18, 2018, 11:25 PM IST
वाहतूक नियम मोडल्याने बाचाबाची, मारहाणीत एकाचा मृत्यू  title=

मुंबई : वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल जाब विचारणाऱ्याला, हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतल्या कुर्ला इथली ही संतापजनक घटना आहे. संपत सोनावणे असं मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

संपत सोनावणे कुर्ल्यातल्या ठक्कर बाप्पा कॉलनी सिग्नलवरुन घरी जात होते. त्यावेळी वाहतूक नियम डावलून विरुद्ध दिशेनं दुचाकीवरुन दोघे जण आले. संपत यांनी त्या दोघांना याबाबत जाब विचारला. त्याचा राग येऊन त्या दोघांनी केलेल्या मारहाणीत संपत यांच्या डोक्याला दुखापत झाली. म्हणून संपत यांना राजावाडी रुग्णालयात नेलं असता, तिथे त्यांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठवलं.

मात्र संपत यांच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्यानं, त्यांचा त्रास वाढला. त्यामुळे त्यांना सायन रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मारहाण करणाऱ्या राहुल बाबारिया आणि मनोज बनसोडे या दोघांना, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केलीय.