मुंबईत छापील किंमतीपेक्षा दुधाच्या पिशवीमागे, १ रूपया घेण्याचं प्रमाण जास्त

मुंबईत बहुतांश ठिकाणी, किंवा एखाद्या नामांकित कंपनीचं दुधाची पिशवी खरेदी करताना, १ रूपया जास्त मागितला जातो.

जयवंत पाटील | Updated: Dec 7, 2017, 03:04 PM IST
मुंबईत छापील किंमतीपेक्षा दुधाच्या पिशवीमागे, १ रूपया घेण्याचं प्रमाण जास्त

मुंबई : मुंबईत बहुतांश ठिकाणी, किंवा एखाद्या नामांकित कंपनीचं दुधाची पिशवी खरेदी करताना, १ रूपया जास्त मागितला जातो.

सर्वात भयानक आणि वाईट गोष्ट म्हणजे मुंबईकर याकडे सरळ कानाडोळा करतात, या तुलनेत महाराष्ट्रातील इतर शहरात १ रूपया किंमतीपेक्षा जास्त देण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, कारण याबाबतीत बहुतांश ग्राहक जागृक दिसून येतात.

एक ईमेल करा, तुम्हाला न्याय मिळेल...

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही प्रत्येक वेळेस दूध खरेदी करताना, १ रूपया जास्तने खरेदी करत असाल, तर तुमचे किती पैस जास्त जातात याचा विचार करा. यापेक्षाही जो विकतोय, तो दुकानदार दिवसभरात अशा हजार पिशव्या विकत असेल, तर दिवसभरात आपल्या दुर्लक्षामुळे तो १ हजार रूपयांची काळी कमाई करतोय, हे देखील म्हणता येईल.

उशीर नको, ईमेलने तक्रार करा

तुम्हाला दूध अव्वाच्या सव्वा भावाने, एक रूपया जास्तीने, किंवा कुलिंग चार्ज लावत असेल तर खालील लिंक वर जा येथे फोन नंबर आहेत. ईमेल अॅड्रेस आहेत.

तक्रार करूनही दुर्लक्ष होत असेल, तर या पत्त्यावर जा आणि तक्रारीचे काय झाले याविषयी हक्काने विचारा...अधिकाऱ्यांना आपली तक्रार समजावून सांगा.

https://legalmetrology.maharashtra.gov.in/1114/Telephone-Directory