पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले

सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल एका रुपयाने कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे.

Updated: Oct 13, 2018, 07:40 AM IST
पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले title=

मुंबई: केंद्र व राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वीच कमी झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दराने पुन्हा उलटा प्रवास सुरु केला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल १८ तर डिझेल ३१ पैशांनी महागले. त्यामुळे आता पेट्रोल व डिझेलची किंमत अनुक्रमे ८८.१२ आणि ७८.८२ इतकी झाली आहे. 

तत्पूर्वी गुरुवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १२ पैसे व २९ पैशांची वाढ झाली होती. 

सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल एका रुपयाने कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये १.५० रुपयांनी कपात केली आहे.