Assembly Election Results 2017

राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही पेट्रोल-डिझेलवरचा आपला कर कमी करणार. यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे.

Updated: Oct 5, 2017, 05:58 PM IST
राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही पेट्रोल-डिझेलवरचा आपला कर कमी करणार. यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे.

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटी दोन रुपयांनी कमी केलीये. त्यानंतर प्रत्येक राज्यांच्या सरकारनेही आपापला कर कमी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले होते. 

केंद्र सरकारच्या आवाहनानुसार लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी झी २४ तासला दिलीये.

पेट्रोलवरील १ रुपया व्हॅट कमी केला तर राज्याचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आणि डिझेलवरील १ रुपया व्हॅट कमी केला तर १२०० कोटी रुपयांचे नुकसान होणार. सध्या राज्यात २४ ते २ रुपये कर आकारला जातो 

पेट्रोलमधून वर्षाला ७३०० कोटी रुपये तर डिझेलमधून १०५०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरानुसार लोकांमध्ये असलेले संतापाचे वातावरण शांत करण्यासाठी भाजपाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जातेय. दरम्यान, केंद्र सरकारनंतर गुजरात राज्याने २ रुपये दर कमी केला आहे. त्यामुळे देवेंद्र सरकार राज्यात किती दिलासा देणार याकडे लक्ष लागलेय.