PHOTO : बिबट्याच्या दहशतीत किरीट सोमय्यांचं फोटो सेशन वायरल

मुलुंडमधील नाणेपाडा परिसरात शिरलेल्य बिबिबट्याने सहा जणांन जखम केलं... 

Updated: Jan 13, 2018, 12:33 PM IST
PHOTO : बिबट्याच्या दहशतीत किरीट सोमय्यांचं फोटो सेशन वायरल

मुंबई : मुलुंडमधील नाणेपाडा परिसरात शिरलेल्य बिबिबट्याने सहा जणांन जखम केलं... 

वन विभागाची बिबट्याला पकडण्याची धडपड सुरू असताना घटनास्थळी पोहचलेल्या भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी जखमींबरोबर सेल्फी काढून आपल्या असंवेदनशीलतेचं दर्शन घडवलं.

बिबट्याच्या दहशतीतलं त्यांचे हे फोटो सेशल आता सोशल मीडियावर चांगलंच वायरल झालंय. 

बिबट्याने नाणेपाडा परिसरात सहा जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळताच स्थानिक खासदार सोमय्या त्या ठिकाणी आले आणि बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांसह इथे आलेल्या पोलिसांबरोबरही त्यांनी सेल्फी काढले.

सोमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हे फोटो आपल्या ट्विटरवर पोस्टह केले. स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण असताना त्यांचे खासदार मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close