उडत्या विमानाखाली ९ मॉ़डेल्स आल्या कशा?

 विमानतळावर मॉडेल्स काही पोज देत असताना या व्हिडिओत दिसतात, मात्र गंभीर बाब म्हणजे याच दरम्यान त्यांच्या डोक्यावरुन विमानाने उड्डाण केलं, हे कॅमेरात कैद झाले आहे.

Updated: Jul 17, 2017, 08:50 PM IST

मुंबई : एका व्हिडिओमुळे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिविल एविएशन’ (डीजीसीए) च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विमानतळावर मॉडेल्स काही पोज देत असताना या व्हिडिओत दिसतात, मात्र गंभीर बाब म्हणजे याच दरम्यान त्यांच्या डोक्यावरुन विमानाने उड्डाण केलं, हे कॅमेरात कैद झाले आहे. विमानतळावरील सुरक्षा नियमांचे उल्लंघन झालेला एका व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ कधी आणि कशापद्धतीने काढला गेला याबाबत चौकशी सुरु असून त्याबाबत अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नाही. विमानतळावर उभ्या असलेल्या या मॉडेल्स आपल्या डोक्यावरुन विमान जात असताना काहीशा खाली वाकतात आणि एकच जल्लोष करत असल्याचेही दिसत आहे.यामध्ये ९ मॉडेल्स उभ्या असून त्यांच्या डोक्यावरुन ९ सिटसचे एक खाजगी विमान उड्डाण करताना दिसत आहे.