मेट्रो ३ कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल

मेट्रो तीन कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल सुरू आहे. कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो तीनचे काम सध्या मुबईत सुरू आहे. यात काही टप्पा भुयारी तर काही हवाई असा आहे. 33 किमी अंतर असणा-या 26 ठिकाणी भूमिगत काम असणार आहे.

Updated: May 28, 2017, 09:33 AM IST
मेट्रो ३ कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल title=

मुंबई : मेट्रो तीन कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल सुरू आहे. कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो तीनचे काम सध्या मुबईत सुरू आहे. यात काही टप्पा भुयारी तर काही हवाई असा आहे. 33 किमी अंतर असणा-या 26 ठिकाणी भूमिगत काम असणार आहे.

साधारण मुंबईत या कामासाठी 1 हजार 74 झाडे तोडली जाणार आहे. यात 3222 झाडांचे पुर्नरोपण केले जाईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशननं दिली आहे. मात्र सध्या चर्चगेट परिसरात अनेक जुनी झाडं तोडण्यात आल्यानं वृक्षप्रेमींमध्ये नाराजी आहे.