प्रभावी प्लॅस्टिकबंदीसाठी २०० इन्स्पेक्टर तैनात

Updated: Jun 14, 2018, 01:09 PM IST

मुंबई : प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका शहरात २०० इन्स्पेक्टर तैनात करणार आहे. २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. हे इन्स्पेक्टर्स बाजारांमध्ये पाहणी करणार आहेत. दुकानदारांकडे किंवा ग्राहकांकडे प्लॅस्टिकची पिशवी आढळली तर त्यांना दंड करण्यात येणार आहे. महापालिकेचे हे इन्स्पेक्टर्स निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये असतील....प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं २३ जून ही अंतिम तारीख दिली होती.