Xiaomi सोबत बिझनेस करा, कमी खर्चात मिळणार MI स्टोअर

चीनची स्मार्टफोन निर्माता शाओमी कंपनी भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करतेय. कारण कंपनीने मोठ्या गुंतवणुकीचा विचार केला आहे.

Updated: Nov 21, 2018, 10:37 PM IST
Xiaomi सोबत बिझनेस करा, कमी खर्चात मिळणार MI स्टोअर title=

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता शाओमी कंपनी भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करतेय. कारण कंपनीने मोठ्या गुंतवणुकीचा विचार केला आहे. या आधी कंपनीने ग्रामीण भागात एका दिवसात ५०० स्टोअर उघडण्याचा रेकॅार्ड रचला आहे. जिनीअस वर्ल्ड रेकॅार्डमध्ये शाओमीच्या या रेकॉर्डचा समावेश आहे. कंपनीच्या नियोजनानुसार, २०१९ च्या शेवटी आणखी ५ हजार एम.आय स्टोअर सुरु करणार आहेत. या निमित्ताने तुम्हाला देखील शाओमीसोबत सामिल होण्याची संधी आहे. जर कमी भांडवलात व्यवसाय करायचा असेल, तर शाओमी तुम्हाला संधी देऊ शकते.

शाओमीचे ग्लोबल उपाध्यक्ष, इंडियाचे व्यवस्थापक संचालक मनु कुमार जैन यांनी सांगितले की, एम.आय स्टोअरचा सरासरी आकार ३०० चौरस फूट असणार आहे. त्यामध्ये एम.आय होम स्टोअरचा सरासरी आकार 1,200 चौरस फूट असणार आहे. एका गावात २ एम.आय स्टोअर्स होऊ शकतात. 

जर तूम्हाला एम.आय स्टोअर चालू करण्याची इच्छा असेल, तर कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन, तुम्हाला स्टोअर फ्रेंचाइजी अॅप्लिकेशन फॅार्म भरावा लागेल. या लिंकवर जावून https://in.event.mi.com/in/apply/mistoreapplicationform अॅल्पिकेशन करू शकता, मोठ्या शहरात १० लाख रूपयांची अट ठेवण्यात आली आहे. 

या ठिकाणी तुमच्या स्टोअरची सर्व ब्रॅण्डिंग ही शाओमीकडून करण्यात येईल. सर्व इंटीरिअर्सचा खर्च शाओमी करणार आहे. तर अनुभव नाही, तर यासाठी ब्रॅण्डवर प्रेम असणे गरजेचं असल्याचं शाओमीकडून सांगण्यात आलं आहे.

या योजनामुळे जवळपास १५००० लोकांना रोजगार मिळणार आहे. ही माहिती शाओमीचे मनु कुमार जैन यांनी दिलीय. मनु कुमार जैन म्हणाले, ऑफलाइन नेटवर्कला आणखी मजबूत करण्यासाठी आणि कंपनीच्या विस्तारासाठी आम्ही काम करीत आहोत.