मुंबईकरांची रखडपट्टी टळली, मोटारमन संघटनेचं आंदोलन मागे

 रेल्वे प्रशासन आणि मोटारमन यांच्यात बैठक यशस्वी झालीयं. 

Updated: Aug 10, 2018, 05:25 PM IST
मुंबईकरांची रखडपट्टी टळली, मोटारमन संघटनेचं आंदोलन मागे

दीपक भातुसे, झी मीडिया,  मुंबई : मोटरमन्सच्या नियमानुसार काम आंदोलनामुळे रेल्वेच्या ६०० फेऱ्या रद्द होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार होते. यासंदर्भात रेल्वे प्रशासन आणि मोटारमन यांच्यात बैठक सुरू होती. ही बैठक यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईकरांची रखडपट्टी टळल्याचे म्हटले जातंय. आतापर्यंत १०० फेऱ्या रद्द झाल्या होत्या.

वेळापत्रक कोलमडलंय 

आपल्या विविध मागण्यांसाठी मोटरमननी नियमानुसार काम आंदोलन करत ओव्हरटाईम करायला नकार दिला होता. त्यामुळे मध्य रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय.  लाल सिग्नल चुकून पासिंग झाल्यास 24 मोटरमनला सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय तुघलकी असल्याची संघटनेची तक्रार होती. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close