मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग

 आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 17, 2017, 08:44 AM IST
मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग

मुंबई : आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यातनं मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत 24 तासात मुंबई शहरात 31.64 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 49.47 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 27.25 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्राच्य काही भागात मुसळधार पाऊस पडेल. तर मराठवाडाच्या काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तवला आहे.