अडीच माणसं देश चालवत आहेत - राज ठाकरे

देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 12, 2018, 07:16 PM IST
अडीच माणसं देश चालवत आहेत - राज ठाकरे

मुंबई : देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि

त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर न्याय मागण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय. राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत म्हटलं की, न्यायाधीशांवर न्याय मागण्याची वेळ आली ही धक्कादायक बाब आहे. तसेच देश अराजकतेकडे वाटचाल करत आहे आणि हे धोक्याचे असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

अडीच माणसं देश चालवत आहेत अशी हल्लाबोल प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी केला सरकारवर हल्ला करत ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलंय.