फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

Updated: Nov 2, 2017, 12:06 PM IST
फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

गेल्या पंधरवड्यात मुंबईतल्या फेरीवाल्यांविरोधात मनसेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

मनसेच्या आंदोलनाविरोधात काल काँग्रेसनं दादर परिसरात फेरीवाला सन्मान मोर्चाचं आयोजन केलं. तिकडे मालाडमध्ये मनसेच्या विभाग अध्यक्षाला फेरीवाल्यांनी जोरदार मारहाण केली. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. 

एलफिन्सटनच्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर आणि आजूबाजूच्या परिसरातली फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केलीय. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी मनसेनं लावून धरली आहे.