प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सरकारला घरचा आहेर

भाजप कार्यकारीणी बैठकीतराज्य सरकारला घरचा आहेर दिला. दरम्यान शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत. 

Updated: Aug 17, 2017, 02:22 PM IST
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सरकारला घरचा आहेर title=

बोरिवली : शेतकरी आत्महत्या ही राज्य सरकारसाठी शरमेची बाब आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकारीणी बैठकीतराज्य सरकारला घरचा आहेर दिला. दरम्यान शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत. 

तसंच दुष्काळसदृश्य परिस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक मुंबईतल्या बोरीवलीमध्ये सुरु आहे. राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेणार असल्याची चर्चा सुरू असताना भाजपाने निवडणुकीची जोरात तयारी सुरू केलीय. 

सप्टेंबरमध्ये एक बुथ २५ युथ अभियान भाजप राबवणार आहे. यामध्ये राज्यातील ९० हजार बुथपर्यंत पक्ष पुन्हा पोहचणार आहे. 

एवढंच नाही तर प्रत्येक बुथवर प्रचारक पाठवत संघटनेचं जाळं मजबूत करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केलीय.