बुलेट ट्रेनने मुंबईची लूट होऊ नये, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी तिकडे अहमदाबादमध्ये भूमिपूजनाची तयारी सुरू असताना इकडे मुंबईत टीकेचा शंखनाद झालाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीकेच्या आड मुख्यमंत्र्यांवर कोरडे ओढण्यात आले आहेत. 

Updated: Sep 14, 2017, 06:32 PM IST
बुलेट ट्रेनने मुंबईची लूट होऊ नये, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

मुंबई : बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी तिकडे अहमदाबादमध्ये भूमिपूजनाची तयारी सुरू असताना इकडे मुंबईत टीकेचा शंखनाद झालाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीकेच्या आड मुख्यमंत्र्यांवर कोरडे ओढण्यात आले आहेत. 

सामनाच्या संपादकीयात खोचक शब्दात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पण त्या बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून जाणाऱ्या 30 हजार कोटी रुपयांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यता आलीय. 

शिवाय कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर आज सामनामधून ताशेरे ओढण्यात आले आहेत.