सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 11:09
सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

मुंबई : उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता. यानंतर विरोधकांनी देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा दिला आहे. 

सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. मात्र मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा राजीनामा फेटाळलाय. एमआयडीसीची ४०० एकर जमीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

First Published: Saturday, August 12, 2017 - 11:08
comments powered by Disqus